ताज्याघडामोडी

पित्याचा वारंवार अत्याचार, बळजबरीने गर्भपात, मुलीच्या मृत्यूनंतर आईनं अन्यायाला वाचा फोडली

पित्यानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात समोर आली आहे. आरोपी पिता मारहाण करून स्वतःच्या मुलीवर अत्याचार करत होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ वर्षाची पिडीत तरुणी ही नालासोपारा परिसरात वास्तव्यास होती.

गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीला क्षयरोग झाल्याने तिला गेल्या आठवड्यात मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर आईने नालासोपारा पोलीस ठाणे गाठत पीडित मृत मुलीच्या हत्येविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यात धक्कादायक बाब उघड झाली. आरोपी वडील मुलीला घरात डांबून तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करत होता. याबाबत बाहेर कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देखील देत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प राहिले.

या काळात मुलगी गर्भवती झाल्याने तिचा आरोपी पित्याने बळजबरीने गर्भपातही केला. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही देखील वडिलाचे आपल्या मुलीवर अत्याचार सुरूच होते. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस दाखवत नालासोपारा पोलिसांत तक्रार दाखल केली. पित्याने केलेले अत्याचार व मारहाणीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. याप्रकरणी पिडीत मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात कलम ३७६(एन), ३५४ (अ), ३४२, ३२२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

3 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

4 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

2 weeks ago