सध्या डिजिटल मार्केटिंगचे जग आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google pay, Phone Pay याचप्रकारे UPI हे ऑप्शन देखील उपलब्ध आहे.
त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून छोटे मोठे पेमेंट केले जातात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून बरेच जण कॅश बाळगत नाही. भाजीपाला घेण्यापासून ते कॉलेजची फीस भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतात. परंतु आता लवकरच तुमचा UPI ID बंद होण्याची शक्यता आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) ने सर्व बँक आणि थर्ड पार्टी ॲप्सला याबाबत निर्देश दिले आहे. ज्या युजर्सचा UPI ID 1 वर्षापासून इनॲक्टिव्ह आहे, म्हणजेच ज्या युजर्सने UPI ID च्या माध्यमातून 1 वर्षात कोणताही व्यवहार केलेला नाही अशी ID बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच आता 31 डिसेंबर नंतर इनॲक्टिव्ह UPI ID बंद करण्यात येतील.
यासंदर्भात बँक किंवा थर्ड पार्टी ॲप म्हणजेच google pay , phone pay च्या माध्यमातून युजर्स ला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवण्यात येईल. त्यानंतर देखील युजर्स ने कोणतीच ॲक्शन घेतली नाही तर UPI ID बंद करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI ने घेतलेला हा निर्णय UPI व्यवहार जास्त सुरक्षित बनवण्यासाठी घेतला आहे. बऱ्याचदा वेगवेगळ्या मोबाईल नंबर च्या माध्यमातून युजर्स UPI ID तयार करत असतात. परंतु मोबाईल नंबर चेंज झाल्यानंतर जुना UPI ID बंद करणे राहून जाते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…