ताज्याघडामोडी

दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे

प्रतिनिधी 

पंढरपूर मतदारसंघात दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा उपजीविकेचा व्यवसाय आहे, दोन महिन्यांपूर्वी ३.५/८.५ गुणवत्तेला ३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन 25 ते 28 रुपयापर्यंत खाली आला आहे त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून उत्पादन खर्चही निघेना असे झाला आहे तरी शासनाने ठरवून दिलेला किमान 34 रुपये इतका दर दूध उत्पादकांना देण्यात यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली आहे.

विखे पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये अवताडे म्हणाले आहेत की सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती आहे शेतीकडून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे उपजीविकेसाठी ते दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत मात्र चाऱ्याचे वाढलेले दर पशुखाद्याचे वाढलेले दर पाहता प्रति लिटर उत्पादन खर्च 35 रुपयापर्यंत जात आहे आणि हाती दर 25 ते 28 रुपये मिळत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे शासनाने नेमलेल्या दूध दर समितीने 34 रुपये दर जाहीर करून सुद्धा खाजगी दूध संघ हा दर देण्यामध्ये असमर्थता दाखवत आहेत तरी आपण लक्ष घालून समितीची पुन्हा बैठक लावावी व तात्काळ दूध दराविषयीचा तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे पत्र देत अवताडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दूधदर वाढवण्यासंदर्भात मागणी केलेली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago