ताज्याघडामोडी

तरुणीने लग्नाला दिला नकार…तरुणाने सात वाहने पेटवली

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या काठे गल्ली परिसरात घडली आहे. यात संबंधित तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केली आहे. सुमित, विकी अशी त्यांची नावे आहेत.

फिर्यादी तरुणी आणि संशयित सुमित पगारेची ओळख आहे. सुमितने फिर्यादी तरुणीकडे सातत्याने त्याच्याशी लग्न करण्याचा तगादा लावला होता. मात्र तरुणीने वेळोवेळी त्याला नकार दिला होता. संबंधित तरुणीने यावेळीही त्याला नकार दिला. त्यामुळे सुमितला राग अनावर झाला. संतापलेल्या सुमितने त्याचा साथीदार विकीच्या मदतीने सात वाहने पेटवून दिली. यामध्ये तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाचा समावेश आहे. ही सर्व वाहने जळून खाक झाली आहेत.

स्थानिकांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांश वाहने जळून राख झाली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच या दोघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago