जिल्ह्यात महाड तालुक्यातील नडगाव हद्दीमध्ये अरुण नगर या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवाशी असलेल्या इसमाचा स्वतःच्या फ्लॅटमध्येच मृतदेह सापडला आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात नसल्यामुळे ही बाब लवकर कोणाच्याही लक्षात आली नाही. परंतु काल सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे असा प्रश्न निर्माण झाला.
यामुळे तपास केला असता अरुण नगर सोसायटी येथील रहिवाशी जयदीप बळीराम येरूनकर यांचा मृत्यूदेह तीन दिवसापासून त्यांच्या खोलीमध्ये आढळला. आजूबाजूच्या रहिवाशांनी ही गोष्ट पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जयदीप येरुनकर यांना पूर्वीपासून मधुमेहाचा खूप त्रास होता. तसेच मधुमेहाचा त्रास अधिक वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
तसेच जयदीप येरूनकर आणि त्यांची पत्नी यांचे देखील क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असत. असे देखील शेजाऱ्यांनी सांगितले आहे. दिवाळी सणामध्ये जयदीप यांच्या पत्नी त्यांना एकटे सोडून गेल्या असल्यामुळे त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास अतिरिक्त प्रभारी पोलीस अधिकारी सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबर्गे हे करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…