आपल्या मुलाचे एका २२ वर्षीय महिलेशी असलेल्या अनैतिक संबधाला विरोध असल्याच्या वादातून बापाने मुलासह एका साथीदारानी संगनमत करून खुनाचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फेनिक्युलर रोपवेच्या जवळील झुडुपांमध्ये घडली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे एका आरोपीला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील आरवली गावात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागा हरिनारायण यादव (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अमर लोटन सिंग आणि लोटन सिंग असे फरार असलेल्या बापलेकांची नावे आहेत. मेनका राधाकृष्ण रवानी (२२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृतक मेनकाशी फरार आरोपी अमरचे अनैतिक संबध होते. मात्र मृतक खालच्या जातीची असल्याने त्यांच्या या संबंधाला अमरचा बाप मुख्य आरोपी लोटन सिंगचा विरोध होता. त्यातच आरोपी अमर आणि मृतक महिलेसोबत काही कारणावरून वाद होत होते. त्यामुळे आरोपी अमरने या महिलेचा पिच्छा सोडविण्यासाठी त्याने आरोपी बापाला साथ दिली.
अटक आरोपी नागा याला सोबतीला घेऊन या तिघांनी खुनाचा कट रचला होता. त्यानंतर २५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत मेनकाला आरोपी अमरने बहाण्याने कल्याण पूर्वेतील पिसवली गावात बोलवून घेतले. तर अटक आरोपी नागा आणि मुख्य आरोपी बाप हे दोघेही आदीच ठरल्याप्रमाणे घाटनस्थळी दबा बसले होते. दरम्यान संध्याकाळनंतर अंधार पडताच मृतक महिलेला आरोपी अमर अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झुडपात तिला घेऊन गेला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून तिच्याच परकरच्या नाडीने तिचा गळा आवळून खून केला. घटनास्थळावरुन तिघेही फरार झाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…