ताज्याघडामोडी

खेळण्याच्या वयात 11 वर्षीय मुलीच्या गळ्यात बांधलं मंगळसूत्र; 13 वर्षाचा नवरदेव, आता..

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक व्यक्ती या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतो. मात्र, काही वेळा लग्नाच्या अशा काही घटना समोर येतात, ज्या हादरवून टाकतात. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. बालविवाहाचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे.

यात 11 वर्षांची नवरी अन् 13 वर्षांचा नवरदेव होता. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील बालविवाहाचं वास्तव समोर आलं आहे, जे चिंता करायला लावणारं आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. मात्र, कायद्याला झुगारून बालविवाह लावून देत असल्याच्या घटना समोर येत आहे.

आष्टी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील ही घटना आहे. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आईने 11 वर्षांच्या मुलीचा विवाह करमाळा तालुक्यातील देवळाली येथील 13 वर्षांच्या मुलासोबत हळदी समारंभात लावून दिला.

या प्रकरणात ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके यांच्या फि्यादीवरून सुशीला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीच्या आईने विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकाराला वाचा फोडली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

14 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago