शाळा हे विद्येचं मंदीर असतं आणि शिक्षकांना तर मोठा मान असतो. पण काही जण आपल्या कृत्याने या शिक्षकी पेशाला काळिमाच फासतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामधून उघडकीस आली आहे.
जिथे एका शिक्षकाच्या कृत्याने गदारोळ माजला आहे. मथुरा येथील शाळेतील एका शिक्षकाने वर्गातच एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कपडे न घालता शिक्षक विद्यार्थिनीच्या जवळ आला आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला.
हा घृणास्पद प्रकार वर्गातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. पीडित विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांसह आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना उघडकीस आल्यावर आरोपी शिक्षक फरार झाला असून त्याचा कसून शोध घेत येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कोसीकलन ठाणे हद्दीतील गावातील सरकारी शाळेत ही घटना घडली.
या शाळेत 9व्या इयत्तेत शिकणारी ही विद्यार्थिनी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. तिच्या घरच्यांनी तिला शाळेत जाण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली आणि तिने जाण्यास नकार दिला. तुला शाळेता का जायचं नाहीये, काय कारण आहे, असं घरच्यांनी तिला विचारलं आणि तिचा बांधच फुटला. तिने घरच्यांसमोर सगळा प्रकार कथ केला. गोविंद नावाच्या शिक्षकाने शाळेत माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे विद्यार्थिनीने सांगितले. 6 नोव्हेंबरला मी शाळेत गेली असताना आमचे शिक्षक, गोविंद सर यांनी कपडे काढले आणि ते माझ्यासमोर आले. त्यांनी मला जवळ ओढलं आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
तिच हे बोलणं ऐकून घरचे हादरलेच. त्यांच्या प्रथम तिच्यावर विश्वासच बसेना. त्यांनी तातडीने शआळा गाठली आणि मुख्याध्यापकांना भेटून त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्या वर्गात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…