प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली.
स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि मुलाची नावे आहेत. मृत महिलेचे पती हे बिहार मधील नामांकित पत्रकार आहेत. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. ज्यामुळे आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या संपूर्ण प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकरण बिहारमधील पूर्णिया येथील आहे. स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा या दोघांनी आत्महत्या केली. सुरुवातील कौटुंबिक वादातून दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तपासादरम्यान या मायलेकाने कौटुंबिक कलहामुळे नाही तर विश्वासघात प्रेमसंबाधातून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
गर्लफ्रेंडच्या वडिलावंर उपचार करण्यासाठी परिजातने 20 लाखांचे कर्ज घेतले. लाखो रुपये त्याने प्रियाच्या आकाऊंटवर ट्रान्सफर केले होते. यामुळे तो कर्जात बुडाला. परिजात याने आई आणि भावाच्या नावावर सावकार तसेच अनेकांकडून कर्ज घेतले होते. सावकाराने परिजात तसेच त्याच्या आईकडे पैशांचा तगादा लावला होता. पैसे वसुल करण्यासाठी सावकार त्यांच्या घरी येवून गोंधळ घालत होते. यामुळे त्यांची मोठी बदनामी होती. कर्ज फेडणे शक्य नसल्याने नैराश्यामुळे परिजात आणि त्याच्या आईने आत्महत्या केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…