ताज्याघडामोडी

कॉफी शॉपच्या नावाखाली नको तो उद्योग, पोलिसांनी धाड टाकली अन् अश्लील चाळे करणारी जोडपी रंगेहाथ सापडली

२५०ते ५०० रुपयांत अश्लील चाळे करण्यासाठी तरुण- तरुणींना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जालना शहरातील मंठा रोडवरील कॅफे फुड ट्रेझर कॉफी सेंटरवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे.जालना शहरातील मंठा चौफुली परिसरतील प्रीती सुधा नगर भागात असलेल्या कॅफे फूड ट्रेझर या कॉफी सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी पोलिसांना कॅफेमध्ये तीन जोडपी मिळून आली त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.

या दुकानात कॉफी सेंटरच्या नावाखाली युवक-युवती अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुनच पोलिसांनी ही धाड टाकली. सुमित कैलास केसापुरे (वय 29 वर्ष रा. भावसार गल्ली, जालना) हा कॅफेच्या काउंटरवर मिळून आला . या प्रकरणी कॅफे मालक सुमित केसापुरे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या शॉप मध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींकडून कॅफे फुड शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी कंम्पार्टमेंन्ट उपलब्ध करुन देण्यात येत होते.यासाठी मुव २५० रु कॅबीन तर ५००रु. सोफासेट रुमचे चार्ज घेऊन या जागेचा वापर मुला-मुलींना हॉटेलच्या बेड रूमसारखा करून दिला जात असल्याचा प्रकार उकडकीस आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन सदर बाजार जालना हद्दीत दिनांक 07.11.2023 रोजी पोलीस स्टेशनला हजर असतांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मंठा रोडवरील कंफे फुड ट्रेझर या शॉप मध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींकडून कॅफे फुड शॉपच्या नावाखाली कंम्पार्टमेन्ट उपलब्ध केली जाते. आणि त्याकरीता 250 रु. कॅबीन व 500/-रु. सोफासेट रुमचे चार्ज घेऊन जागा उपलब्ध केली जाते. त्या जागेमध्ये मुला-मुलींना जागेचा वापर हॉटेलच्या बेड रुमसारखा करून दिला जातो अशी माहिती मिळाली, यावरून सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन, महिला पोउपनि श्रीमती दिपाली शिदे, महिला पो.हे.का. कल्पना बोडखे, पो. अं. भरत ढाकणे, पो. अं. प्रदिप करतारे यांनी छापा मारण्याचे ठरविले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

19 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

19 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago