जग विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत असताना, दुसरीकडे अंधश्रद्धा, तांत्रिक, मांत्रिकांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातून काही वेळा फसवणूक, हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात गोंडा इथे अशाच प्रकारची लाजिरवाणी घटना घडली आहे. एका मांत्रिकाच्या नादी लागून आई-वडिलांनी त्यांच्या लहान मुलीचा अंधश्रद्धेपोटी बळी दिल्याचं समोर आलं आहे. आपल्याला मुलगा व्हावा या इच्छेतून दाम्पत्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातल्या गोंडा इथे एक धक्कादायक घटना घडली. अत्यंत क्रूर मनोवृत्तीच्या पालकांनी आपल्या 22 महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचं समोर आलं आहे. दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा होण्यासाठी मांत्रिकाने या दाम्पत्याला मुलीचा बळी देण्यास सांगितलं. सध्या आरोपी आईसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. मृत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. निष्पाप मुलीचा बळी दिल्याची बातमी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…