ताज्याघडामोडी

2 चुलत भावाचं एकाच महिलेवर आला जीव, दोघेही भिडले अन् नको ते घडलं

प्रेमप्रकरणांमुळे हत्या झाल्याची अनेक प्रकरणं अलीकडे घडतात. नागपुरातही लिव्ह इन पार्टनरमुळे एकाची हत्या करण्यात आली आहे. दोन चुलत भावांचं एक महिलेमुळे भांडण झालं आणि दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागला. आरोपीने चुलत भावावर सात वार करून त्याचा खून केला. दोघेही चुलत भाऊ 35 वर्षांच्या एका महिलेच्या प्रेमात पडल्याने ही घटना घडली. 47 वर्षीय आरोपी राजेश चौहान उर्फ गब्बरच्या लिव्ह इन पार्टनरने लग्न न करता त्याच्या मुलांना जन्म दिला होता; पण नंतर या महिलेचा गब्बरच्या चुलत भावावर जीव जडला आणि खुनाची घटना घडली.

महिलेचा लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या गब्बरने आपला 40 वर्षीय चुलत भाऊ नितीन रोहनबागच्या हत्येकरिता मदत करण्यासाठी दोन पुतण्यांना बोलावलं. नितीन इमामवाडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जाट तरोडी इथल्या घरी बेडरूममध्ये एका महिलेसोबत पकडला गेला. खुनाच्या अवघ्या 24 तास आधी एका सरकारी आरोग्य सुविधेचा परिचारक असलेल्या गब्बरविरोधात महिलेने मारहाणीची तक्रार दिली होती.

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर गब्बर 12 वर्षांपासून एका महिलेसोबत राहत होता. तिने अलीकडेच वेगळं होण्यासाठी कायदेशीर प्रकरण दाखल केलं आहे. रोहनबाग हा आधीच दोन मुलांचा बाप होता आणि अलीकडेच तो गब्बरच्या लिव्ह-इन पार्टनरच्या प्रेमात पडला होता.

रोहनबागला गब्बरची लिव्ह-इन पार्टनर आवडायची. त्यामुळे चुलत भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि महिलेवरही गब्बरने राग काढला. गब्बरने घरातलं सामान सिरसपेठहून जाट तरोडीतल्या नवीन भाड्याच्या घरात नेण्यासाठी रोहनबागची मदत मागितल्यानंतर सगळं सुरू झालं. रोहनबाग व गब्बरच्या पार्टनरमध्ये जवळीक वाढली आणि रोहनबागने संसार थाटण्यासाठी गब्बरच्या घरी राहण्याची ऑफर दिली; पण गब्बरला रोहनबागवर संशय आला आणि यावरून अनेकदा त्यांचं भांडण झालं. दरम्यान, गब्बरने त्याच्या पहिल्या पत्नीलाही भेटायला सुरुवात केली होती. रोहनबागच्या पत्नीलाही पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली आणि तिने महिलेशी संबंध तोडून घरी परतण्यासाठी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर गब्बरच्या लिव्ह इन पार्टनरने दोघांविरुद्ध बंड केल्यावर दोन्ही प्रेमीयुगलांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन या प्रकरणावर चर्चा केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago