2,000 रुपयांच्या नोटा आता पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट प्रादेशिक कार्यालयांना पाठवता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया( RBI) लोकांना त्यांच्या बँक खात्यात रु.2,000 च्या नोटा जमा करण्यासाठी TLR (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) फॉर्मही देणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
यासंदर्भात माहिती देताना ‘आरबीआय’चे प्रादेशिक संचालक रोहित पी दास यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा विमा उतरवलेल्या पोस्टद्वारे RBI कडे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित पद्धतीने पाठवण्यास प्रोत्साहित करतो. आता ग्राहकांना दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी बँकांच्या विशिष्ट शाखांमध्ये जाण्याची तसेच रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा असलेल्या सार्वजनिक आणि संस्थांना सुरुवातीला 30 सप्टेंबरपर्यंत त्या बदलून किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…