ताज्याघडामोडी

पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा मनात घेऊन अल्पवयीन मुलीनं घर सोडलं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्याच्यासोबत छत्तीसगडहून पुणे गाठलं. पण आरपीएफ जवानाने त्या अल्पवयीन मुलीला पाच डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल केलाय. 

पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. ती आणि तिचं कुटुंब छत्तीसगडमधील राज्यात राहतं. शाळेत शिकत असताना तिचं लीलाधर ठाकूर नावाच्या मुलावर प्रेम जडलं. दोघांनी लग्न करण्याचं वचन एकमेकांना दिलं. लीलाधर ठाकूरने तिला सांगितलं की तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. पुण्यात जाऊन आपण लग्न करू अशी बतावणी त्याने केली.

लीलाधरच्या या प्रेमी गोष्टींना पीडिता भाळली आणि तिने त्याच्यासोबत घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी १२ सप्टेंबर रोजी पुणे गाठलं. पुणे रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्याच्या जवळ तीन व्यक्ती आल्या. त्यांनी त्यांना हटकलं. त्यानंतर त्यांनी या दोघांना पोलिसांकडे नेले. तेथे अनिल पवार नावाचा पोलीस कर्मचारी होता. अनिल पवार याने पीडित मुलगी आणि लीलाधर ठाकूर याला बराच वेळ बसवून ठेवले.

त्यानंतर रेल्वे जवान अनिल पवार याने या दोघांना रेल्वे कॉलनीतील एका खोलीत कैद केले. या दोघां त्याने पैश्याची मागणी केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बाहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यानंतर कमलेश आणि अनिलने लीलाधरला सोडून दिले. मात्र पीडितेला तेथेच डांबून ठेवले. त्यानंतर पवार आणि तिवारी हे तिच्यावर बलात्कार करत राहिले. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना त्याची मुलगी पुण्यात असल्याची माहिती झाली. ते छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि पीडितेची सुटका केली. घरी गेल्यानंतर तिने छत्तीसगड पोलिसांना आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

14 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago