ताज्याघडामोडी

मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला

वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईची गळा दाबून हत्या करणाऱ्या मुलाला एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ह्या आरोपीचे नाव रूपचाँद रेहमान शेख असून तो २१ वर्षाचा आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख आणि आरोपी रूपचांद शेख ह्या दोघांमध्ये कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून मुलगा रूपचांद याने आईचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. या घटनेसंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कोपरी गावातील गावदेवी मंदिराजवळील सागर भोईर इमारतीत आरोपी हा आई समवेत राहतो. सलमा घरकाम करून कुटुंब चालवत होती. मात्र तिचा मुलगा रुपचाँद हा काहीही काम करत नव्हता. त्यामुळे सलमा त्याला कामावर जाण्यासाठी तगादा लावत होती. त्याचे आणि त्याची सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख यांच्यात कायम वादावादी होत होती. रविवारी रात्री हि अशीच वादावादी सुरु असताना १.२० च्या सुमारास रूपचाँद शेख आणि आई यांच्यात कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago