जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बैठकीत सूचना
सोलापूर, दिनांक 26 (जिमाका):- भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक कारागीर यांचा समावेश होतो. या पारंपारिक कारागीरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. तरी जिल्ह्यातील अठरा पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांची नोंदणी करून त्या लाभार्थ्यांचे सरपंचामार्फत व्हेरिफिकेशन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊन या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी ग्रामोद्योग अधिकारी धुरंदर बनसोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, कौशल्य विकास चे सहाय्यक आयुक्त हनुमंतराव नलावडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या पारंपारिक व्यवसायातील सर्व लाभार्थ्याना या योजनेचा लाभ होण्यासाठी जिल्हा ग्रामोदय कार्यालय व सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने त्यांच्या स्तरावरून प्रयत्न करावेत. या योजनेच्या प्रचार व प्रसार करून पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा ग्रामीण ग्रामोद्योग अधिकारी श्री बनसोडे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती बैठकीत सादर केली. यामध्ये लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार इत्यादी व्यवसायांमध्ये गुंतलेले कारागीर हे विश्वकर्मा असल्याचे त्यांनी सांगितले. ही कौशले किंवा व्यवसाय पिढयान-पिढया पारंपारिक प्रशिक्षणाच्या गुरु-शिष्य मॉडलचे पालन करुन, कुटुंबातील आणि कारागिरांच्या इतर अनौपचारिक गटामध्ये केले जातात, असेही त्यांनी सांगितले.
*प्रारंभी खालील अठरा उद्योग या योजने अंतर्गत समाविष्ठ केले आहेत….
सुतार, बोट बनविणारा, चिलखत बनविणारा, लोहार, हातोडा आणि हत्यारे / औजारे / साहित्यांचा संच बनविणारा, कुलुपे बनविणारा, शिल्पकार (मुतींकार, दगड कोरणारा ), सोनार, कुंभार, चांभार, गवंडीकाम, टोपली/चटई / झाडु बनविणारा, बाहुली आणि खेळणी बनविणारा, न्हावी, माळा बनविणारा, धोबी, शिंपी, मासे पकडण्याचे जाळे बनविणारा आदी.
योजने साठी पात्रता –
1 स्वंयरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि निदिष्ट केलेल्या 18 व्यवसायांपैकी कुटुंब आधारित पारंपारिक कारागीर नोंदणीसाठी पात्र असेल. 2. लाभ प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील आणि कुटुंबातील व्याख्या अशी असेल : पती, पत्नी आणि अविवाहित मुले. 3. लाभार्थीचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. 4. जर एखाद्याला विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल ज्यामध्ये त्याने नोंदणीच्या वेळी व्यवसाय काम करण्याची माहिती दिली होती. 5. आणि तिने मागील 5 वर्षात स्वंयरोजगार/व्यवसाय विकासासाठी तत्सम क्रेडिट आधारीत थि व योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. उदा/- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे PMEGP/CMEGP आणि PM SVANIDHI तथापि MUDRA आणि PM SVANIDHI चे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असतील. 6. सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत.
योजनेचे फायदे :-
1 यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.
2. कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसीय बेसीक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय प्रगत प्रशिक्षण – दिले जाणार आहे.
3. प्रशिक्षण कालावधीत रु.500/- रोज विद्यावेतन दिले जाणार आहे.
4. प्रशिक्षण पूर्ण करणा-या कारागिरांना टूलकिट खरेदीसाठी रु.15000/- चे ई-व्हावचर दिले जाईल. 5. मुलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थी लाभ घेण्यासाठी पात्र होईल पहिल्या टप्यात 5 टक्के व्याजासह 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 1 लाखापर्यंतचे तारण मुक्त कर्ज.
6. दुस-या टप्यात प्रगत कौशल्य प्रशिक्षण घेतले आहे. डिजिटल व्यवहार स्विकारलेले आहेत. त्यांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह २ लाखापर्यंतचे तारण मुक्त कर्ज.
7. डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन, लाभार्थींना जास्तीत-जास्त 100 व्यवहारांसाठी मासीक प्रति व्यवहार प्रोत्साहन रु.1/- मिळेल.
8 मार्केटिंग सहाव्य : प्रचार-प्रसिध्दी, गुणवत्ता प्रमाणीकरण, बँन्डींग, प्रदर्शने,
1 नाव नोंदणीसाठी अर्ज कोठे करावाः- सामान्य सेवा केंद्र (कॉमन सव्हिस सेंटर) सेंटरकडे पंतप्रधान विश्वकर्मा पोर्टलवर ऑनलाईन अर्जाव्दारे लाभार्थी नांव नोंदणी करावी किंवा ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे सरपंच यांना भेटुन नांव नोंदणी करावी तसेच शहरी भागासाठी नगरपरिषद कार्यालयामार्फत कॉमन सर्विस सेंटरकडे नांव नोंदणी करावी. सदर योजनेअंतर्गत नांव नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
2. लाभार्थीच्या तपशिलांची तपासणी ग्रामपंचायत प्रमुख / शहरी स्थानिक संस्थेचे कार्यकारी प्रमुख यांच्याव्दारे केली जाईल.
3. त्यानंतर जिल्हा अंमलबजावणी समिती तपासणी करेल आणि लाभार्थींच्या नावाची शिफारस करेल.
4. त्यानंतर स्क्रीनिंग समिती : जिल्हा समितीने शिफारस केलेल्या लाभार्थीचे प्रस्तावांचे पुनरावलोकन आणि मूल्यांकन करण्यात येवून लाभार्थीची अंतिमत: निवड करण्यात येईल.
तरी सोलापूर जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.