गुरे चरण्यावरून जुना वाद उफाळून आल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना खार्डी येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील खार्डी गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या वसंत सखाराम भोईर (५३) आणि प्रकाश यशवंत घरत (४५) या दोन शेतकऱ्यात म्हशी चरण्यावरून वाद होत होते. गुरे चरण्यावरूनच रविवारी संध्याकाळी मोठा वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी हे दोघे आपल्या म्हशी चरण्यासाठी आपल्या गावाच्या बाहेर लांबवर घेऊन गेले होते. याचदरम्यान म्हशी एकमेकांच्या कळपात घुसल्या. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांमध्ये जोरदार जुंपली आणि हाणामारी झाली. यावेळी आरोपी वसंत सखाराम भोईर (५३) याने प्रकाश यशवंत घरत (४५) याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. याप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात आरोपी वसंत सखाराम भोईर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…