ताज्याघडामोडी

पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय; जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, मात्र…

जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तामुळे काल २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एकाचा कट रोखला गेला.

या घटनेतील आरोपी तसेच फिर्यादी मूळ अकोला जिल्ह्यातील असून आरोपीने पत्नीला संपवण्याचा कट बुलढाण्याच्या राजुर घाटात रचला होता. या संदर्भात रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीस ताब्यात सुध्दा घेण्यात आले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख इब्राहिम शेख चांद यानी संशयातून पत्नीस फारकत देण्याचे ठरविले. काल २३ ऑक्टोबरच्या दुपारी कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटात आणले.

त्यानंतर ओढणीने गळा आवळला. यानंतर पत्नी ओरडल्याने परिसरात आवाज झाला. यावेळी पोलीस चौकीत असलेले होमगार्ड सोमनाथ वानरे, शुभम शेळके यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या प्रसंगावधान तेने मोठा अनर्थ टळला. प्रकरणातील आरोपी वर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago