दारू पीत असल्याची माहिती घरात सांगितल्याच्या रागातून एका तरुणाने वृध्द महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कोल्हापुरातील सुभाषनगरातील हरिव चर्चच्या कंपाउंड लगत घडली असून लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ६५, मूळ गाव कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. दरम्यान, माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाची सूत्र तीव्र गतीने फिरवत अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावला आणि संशयित आरोपीस अटक केली असून प्रतीक विनायक गुरुले (वय २२, रा. प्लॉट नंबर ४, संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी क्षीरसागर या २१ तारखेला रात्री आठच्या सुमारास नातीला घेऊन नवरात्र कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान नातीला सोडल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत यामुळे कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या न सापडल्याने मुलगा गणेश क्षीरसागर याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती.
दरम्यान काल सकाळी सुभाषनगरातील हरिव चर्चच्या कंपाऊंडलगत एका वृद्धेचा खून झाल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे तत्काळ दाखल होत तपास सुरू केला. वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याने चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. मात्र, शरीरावरील कपड्यांमुळे आणि शरीरयष्टी वरून या लक्ष्मी क्षीरसागर असल्याचे मृत महिलेच्या नातेवाईकांनी ओळखले. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचान्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अज्ञात संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राथमिक चौकशी केली असता पोलिसांना प्रतिक गुरुले हा संशयित आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…