दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर झाल्याने मद्यपीने तरुणाची सुर्याने भोसकून हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रामनगरमध्ये घडला. विजय चौहान (२९) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी आरोपी सनी बैद (३२) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात राहणारा मृत विजय रविवारी रात्री उशिरा डगलाईनच्या नाल्याजवळ लघुशंका करण्याकरिता गेला होता. यावेळी तेथे आरोपी सनी बैद हा दारूच्या नशेत होता. त्याने विजयकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी विजयने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन आरोपी सनी याने धारदार सुऱ्याने विजयच्या पोटात चाकू भोसकून ठार केले. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी तात्काळ आरोपी सनी याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी सनी याला न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.
आठवड्याभरापूर्वी वागळे इस्टेट येथील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोड नं. ३४ भागात देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये झालेल्या राड्यात फटाके पेटविल्याने आणि दगडफेक झाल्याने पाचजण जखमी झाले. या प्रकरणात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील हनुमान नगर भागात शिवसाई क्रीडा मंडळ आणि हनुमान नगर रहीवासी कमिटी हे दोन मंडळ आहेत. या दोन्ही मंडळांकडून वेगवेगळ्या ठिकाणी नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. शिवसाई क्रीडा मंडळाच्या मंडपाजवळ हनुमान नगर रहिवासी कमिटीच्या देवीची मिरवणूक आली असता कोणीतरी मंडपाजवळ फटाके फोडले. या घटनेवरून दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…