१७ वर्षांपासून विकासकासाठी काम करणाऱ्या चालकाला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. हा चालक त्याच्या मालकाचे १.०६ कोटी रुपये घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संतोष चव्हाण याने आपला मोबाईल फोन बंद केला होता, तर लोकेशन कळू नये म्हणून तो वेगवेगळी वाहनंही बदलत होता. त्यामुळे तो सीसीटीव्हीपासूनही वाचत राहिला.
ही चोरी ११ ऑक्टोबर रोजी झाली होती. विकासक सरकारी कार्यालयात जात होता आणि त्याच्या कारच्या बूटमध्ये २५ लाख रुपये ठेवले होते. त्यांनी चव्हाणला पैशांबाबत सांगितले आणि गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, अर्ध्या तासाने ते परत आले असता चव्हाण रोख रक्कम आणि कार घेऊन गायब झाला होता. त्याचा फोन बंद होता. चव्हाण यांनी बिल्डरच्या कार्यालयातून आणखी ७५ लाख रुपयांची चोरी केल्याचंही पोलिसांनी सांगितले.
कार घेऊन फरार झाल्यानंतर चव्हाणने जोगेश्वरी येथे कार सोडली आणि ऑटोरिक्षा केली. तेथून तो हब मॉल, गोरेगाव येथे गेला, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.पोलिसांच्या पथकाने त्याच्या घणसोलीतील घरी भेट दिली, मात्र तो तिथे नव्हता. तपासात पोलिसांना कळाले की, त्याच्या पत्नीने त्याच्या मुलाला शाळेतून लवकर घेतले होते. तसेच, त्याच्या मोबाईल नंबरचा वापर करून कोणतेही कॉल केले गेले नव्हते, त्यामुळे त्याने तो बंद करुन मोबाईल टाकून दिल्याचं समजते, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…