फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय टेक्नोफॅब २३ उत्साहात संपन्न
सांगोला :- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च मध्ये टेक्नोफॅब २३ या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन २१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे टॉप गियर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक,मा.श्री.श्रीकांत पवार ,तर प्रमुख उपस्थिती प्रा. बी. डी गायकवाड ,(मेकॅनिकल विभाग,स्वेरी कॉलेज), प्रा. भीमाशंकर पैलवान ( माजी प्राचार्य ,विद्या मंदिर , सांगोला ) यांच्या हस्ते करण्यात आले. टेक्नोफॅब २३ चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण करणे, त्यांचे कार्य प्रदर्शित करणे आणि विविध क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान शोधणे हे आहे. टेक्नोफॅब २३ या परिसंवादात मध्ये, पेपर प्रेझेंटेशन, टेक्निकल प्रश्नमंजुषा, रोबो रेस या सारख्या विविध स्पर्धाचा समावेश आहे , हि एक विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संधी आहे ,अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सुभाष जाधव ( संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता ) यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा.श्री.श्रीकांत पवार यांनी सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याबरोबर आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्याच बरोबर तुमच्या कलागुणांना चालना देण्यासाठी तुम्ही सातत्याने पर्यंत केले पाहिजे ,शैक्षणिक पदवी बरोबर तांत्रिक कौशल्य आत्मसात करावीत. तसेच खरे शिक्षण हे सामाजिक परिसंवादातून निर्माण व्हावे ,नेहमी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, मोठी स्वप्न बघा, मोठे व्हायचे असेल तर पर्यन्तअंती मार्ग सापडतात. असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
टेक्नोफॅब २३ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानावर काम कराण्यसाठी प्रोत्साहन मिळते. टेक्नोफॅब २३ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्याचे अद्यावत कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळते . असे प्रतिपादन प्रा. बी. डी गायकवाड यांनी केले
प्रा. भीमाशंकर पैलवान म्हणाले कि , जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तांत्रिक विश्वात यश मिळवायचे असल्यास या क्षेत्रातील बदल स्विकारायला हवे व टेक्नोफॅब २३ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळते..
पुढे बोलताना, संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे असावे.स्वर्गीय बिरासाहेब रुपनर याचा दाखला देत त्यांनी सांगितले कि, त्याचे ध्येय मोठे होते, त्यामुळेच हा फॅबटेक एज्युकेशन सोसायटी चा वटवृक्ष आपण पाहोतो आहे.त्यामळे विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पाहावे त्याबरोबरच नेहमी संशोधन वृत्ती अंगीकृत करावी. असे मत व्यक्त केले .
या स्पर्धेला राज्यातील सुमारे १७ महाविद्यालयातून १०५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये सर्व विभागाच्या मिळून २२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी प्रचंड उत्साहीत व प्रेरीत झाले या महाविद्यालयामधून घेतलेल्या अत्याधुनिक तांत्रिक शिक्षणाचा आधार घेत स्वतःमध्ये असलेल्या संशोधन वृत्तीला प्रात्यक्षिकाद्वारे मूर्त स्वरूप प्राप्त करून कल्पना विकास, व्यक्तिमत्व, संभाषण कौशल्य, संघटन कौशल्य, बौद्धिक विकास व आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे संचालक डॉ. डी एस बाडकर यांनी सांगितले.
स्पर्धेच्या परीक्षकांनी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस द्वारे विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधाबद्दल व सर्व कार्यक्रम नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमास कार्यकारी संचालक मा. श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर मा. डॉ. संजय आदाटे ,प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शरद पवार, या बरोबर सर्व विभागाचे विभाग प्रमुख व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप प्रा. प्रियांका पावसकर यांनी केले.
गेल्या काही वर्षात इंजिनिरिंग व औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. हे बदलाचे आव्हान आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्विकारून त्यात संशोधन करून पुढे यशस्वी वाटचाल करावी. टेक्नोफॅब २३ या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाशी ओळख होत असून सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा यासाठी त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहीती होऊन त्यात आपले करियर करावे– मॅनेजिंग डायरेक्टर मा. डॉ.अमित रुपनर
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…