ताज्याघडामोडी

गरबा खेळताना दंड थोपटला; दोन गटात वाद, नंतर तरुणाला भेटण्यास बोलवलं, अन् नको ते घडलं

गरबा खेळण्याच्या ठिकाणी आणि दंड थोपटल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला. शिवाय घटनास्थळावर फायरिंग झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी धुळे शहरातील भाजपा नगरसेविकेचा मुलगा मित भामरे याच्यासह अन्य दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जखमी तरूणाचा भाऊ महेश नंदुलाल बैसाणे, रा. इंदिरा नगर, गोंदूर रोड, धुळे याने देवपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जीटीपी स्टॉपजवळील बडगुजर कॉलनीत तो आणि त्याचा भाऊ अरविंद बैसाणे याचेसह मित्र सचिन ठाकरे, यशोरत्न वाघ, चेतन सोनार, रोशन खैरनार हे दांडीया खेळण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी भाजपा नगरसेविका वंदना भामरे यांचा मुलगा मित भामरे, रा. गौतम नगर, वाडीभोकर रोड, धुळे दादू कपूर, रा. एकता नगर आणि प्रक्षिक वाघ यांच्यासोबत आणखी आठ-दहा जण होते. त्याठिकाणी खून्नस आणि दंड थोपटल्यावरून त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. हा वाद निवळल्यानंतर पुन्हा फोनवरून वाद झाला. रात्री ११ वाजेच्या सुमारास गोंदूर रोडवरील शनी मंदिर जवळ त्यांना बोलविण्यात आले. तेथेच हल्ल्याची घटना घडली.

अरविंद बैसाणे याला मित भामरेने कानशिलात मारली. तसेच प्रक्षिक बाघ याने अरविंदला पाठीमागून धरून ठेवले असता मित भामरेने त्याच्याकडील चॉपरने अरविंदच्या कमरेच्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. तसेच मित भामरे आणि दादू कपूर या दोघांनी त्यांच्याजवळील पिस्टलने महेश बैसाणेच्या दिशेने फायरिंग केले, यात तो बचावला. मारहाणीच्या घटनेत महेशचा मित्र चेतन सोनार हा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात आर्मॲक्ट तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न यानुसार गुन्हा दाखल झाला असून तिघेही आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा तपास देवपूर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago