ताज्याघडामोडी

शिक्षक पित्याचा ३ वर्षीय मुलीवर अत्याचार, डॉक्टर-डॉक्टर खेळू म्हणत कृत्य केलं

डॉक्टर-डॉक्टर खेळू असे म्हणत पोटच्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर पेशाने शिक्षक असलेल्या बापाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक असलेल्या बापाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, चाऊस कॉलनीतील ३५ वर्षीय ला अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभियंता असून तो एका इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. त्याला एक तीन वर्षाची मुलगी असून दोन महिन्यांपुर्वी नुकताच एक मुलगा देखील झालेला आहे. रविवारी दुपारी घरात एकटा असताना बापाने तीन वर्षीय चिमुकलीला डॉक्टर डॉक्टर खेळण्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केला. रात्रीच्या सुमारास अचानक तिला ताप आल्याने आईने तिला उठवले असता जांगेतून रक्त निघत असल्याचे दिसले. आईने तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता घटनेचे बिंग फुटले. आईने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारपुस केली असता बापाने क्रुरतेने अत्याचार केल्याची कबुली दिली. तसेच कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन, अशी धमकीही दिली.

घटनेनंतर बाप घर सोडून वडिलांच्या घरी निघून गेला. चिमुकलीच्या आईने मोबाइलवरून पतीला जाब विचारला असता त्याने उलट पत्नीला शिवीगाळ करत गप्प बसण्यास सांगितले. आईने तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक हारुन शेख यांनी चिमुकलीची घाटीत तपासणी केली असता अत्याचार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. यावरून त्यांनी चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी पहाटेच्या सुमारास हर्सूल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक हरेशवर घुगे करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago