ताज्याघडामोडी

सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं

अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. या दोघींनी अन्न आणि पाण्यातून विष देत थंड डोक्यानी हे हत्याकांड घडवून आणले.

शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी ता. अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि. चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मयतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

२२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. तर रोशनच्या आई-वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १८ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago