मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाची आठवण करून देणारी ही धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. करण आणि गुलनाज यांनी उत्तर प्रदेशमध्ये लग्न केलं होतं आणि नंतर ते मुंबईत आले होते. आरोपी गोरा खान याने आपल्या जावयाला मुंबईतील आपलं नवीन घर दाखविण्याच्या बहाण्याने गोवंडी परिसरात बोलावलं. यानंतर जावयाला निर्जनस्थळी नेलं आणि त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर जावयाच्या हत्येनंतर त्याने स्वतःच्या मुलीलाही संपवलं. करणच्या हत्येनंतर आरोपींनी गुलनाजची हत्या केली आणि तिचा मृतदेह नवी मुंबईत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यात पीडित गुलनाजचे वडील, भाऊ आणि त्याचा मित्र आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…