कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का (शॉक) लागून एका तरुण परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील अन्य एक तरुण देखील भाजला जावून गंभीर जखमी झाला आहे. आज सोमवारी (दि.१६) सकाळी ही घटना घडली आहे. राहुल दरबार राठोड (२२, मध्यप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी (रा. जामनेर) हा गंभीररीत्या भाजला गेला.
मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेला राहुल राठोड हा तरुण आई-वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात राहत होता. एमआयडीसीतील एका प्लास्टिक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने राहुल आज सोमवारी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी काम करीत असताना त्याला विजेचा धक्का (शॉक) लागला. सोबतचा जीवन गजानन चौधरी गंभीररित्या भाजला गेला आहे.
दोघांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी राहुलला मृत घोषित केले. तर जखमी जीवन याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मृत तरुण घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…