ताज्याघडामोडी

घरच्यांना फोन, पत्नी बेपत्ता, मग ती रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत आढळली, भयंकर घटनेचा उलगडा

पतीने आपल्या पत्नीवर हल्ला करुन तिला जखमी केलं त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असं समजून तिला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्याने स्थापन झालेल्या अनुपगढ जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पीडित महिला पशुधन सहाय्यक म्हणून काम करते. पतीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. याचा राग आल्याने पतीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने तिच्या गुप्तांगावरही धारदार शस्त्राने वार केले. आरोपी पतीला वाटलं की तिचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर त्याने तिला विवस्त्र करून रस्त्यावर फेकले.

रायसिंगनगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर सिंह यांनी सांगितले की, कमलेश कुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या वादातून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली होती. पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा गळा आवळला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी धारदार शस्त्राने तिच्या गुप्तांगावर वार करून तिला जखमी केले.

त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला आहे, असे समजून आरोपीने नंतर तिला विवस्त्र करुन घराबाहेर फेकून दिले. यानंतर त्याने पत्नीच्या कुटुंबीयांना फोन करून ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मात्र, सुदैवाने महिला बचावली. रस्त्यात महिलेला त्रास होत असल्याचे पाहून लोकांनी तिला उपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना श्रीगंगानगर येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago