ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, लहान बहिणीवरही वाईट नजर

नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला माहिती दिली मात्र तरीही तिच्या आईनेही दुर्लक्ष केले. पीडितेच्या लहान बहिणीवरही आरोपीने वाईट नजर ठेवल्याने हद्द झाली. अखेर एक दिवस मुलगी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली आणि पोलिस ठाण्यात पोहोचली तेव्हा हे संपुर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या आईला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

२ ऑक्टोबर रोजी जरीपटका पोलिस ठाण्यात १६ वर्षीय तरुणीच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी ही अल्पवयीन मुलगी शोधून तिची चौकशी केली असता पोलिसही चक्रावून गेले. वास्तविक, आईच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून ही तरुणी आपल्या मित्रासोबत पळून गेली होती. पीडित मुलीच्या वडिलांचा २०१९ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. किशोरीला १४ वर्षांची लहान बहीणही आहे. तीची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी धुण्याचे काम करते.

तरूणीच्या आईचे कळमना येथील आरोपी रोहित चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आरोपी अनेकदा तिच्या घरी यायचा. दारू पिऊन आरोपी रोहित चौरे हा अनेकदा महिलेच्या घरी राहायचा. १२ जून रोजी दारूच्या नशेत आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी घरातून निघून गेल्यावर पीडितेने तिच्या आईला याबाबत माहिती दिली असता तिने मुलीला शांत राहण्यास सांगितलं.

यानंतर आरोपीने पीडितेला अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यावेळी आरोपीने तिच्या १४ वर्षांच्या लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेचा लक्षात आले. पीडित मुलीला हे सहन न झाल्याने तिने आरोपीशी हुज्जत घातली आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी काही दिवस शांत राहिला त्यानंतर त्याने तिला फोनवर शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतरच पीडिता तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिच्या आईला अटक केली असून आरोपी रोहित चौरेचाही शोध सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago