पंजाबमध्ये ट्रिपल मर्डर केसची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यसनी तरुणाने स्वतःच्या मोठ्या भावाची, वहिनीची आणि २ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खरारमधून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लखविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
कौटुंबिक कलहामुळे आरोपी लखविंदर सिंगने त्याच्या मित्रासोबत तिघांची हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणाचा तपशील देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याचा मोठा भाऊ सतबीर सिंग (वय ३२), त्याची पत्नी अमनदीप कौर (वय २९) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अनहद यांची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी आपल्या वहिनीची हत्या केली. वहिनीचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर जेव्हा भाऊ कार्यालयातून घरी आला तेव्हा त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचाही खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह आपल्या गाडीत टाकून रोपड कालव्यात फेकून दिले.
आरोपी भाऊ २ वर्षांच्या पुतण्यालाही गाडीतून घेऊन गेला होता. त्याने पुतण्याला जिवंतच कालव्यात फेकून दिले. या घटनेला लखविंदरचा मित्र गुरदीप सिंगनेही मदत केल्याचे सांगितले जात आहे. तो सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरदीपचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या हत्येत वापरलेले हत्यार आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर आरोपी लखबीर सिंग संगरूर जिल्ह्यातील (पंजाब) त्याच्या मूळ गावी पंधेर येथे पळून गेला होता आणि कोणालाही काही कळू नये म्हणून तो नेहमीप्रमाणे कुटुंबात राहत होता. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…