मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केलं आहे.
तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झाला आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठ्यांना कुणबीमधून नको तर मराठी म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. आंदोलकांमधून जरांगे पाटलाच्या विरोधात सूर उमटताना दिसत आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळावे या आपल्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मराठी समाजाला चाळीस दिवसांच्या आत आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठी समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात त्यांचे दौरे सुरू आहेत, येत्या 14 ऑक्टोबरला त्यांची अंतरवाली सराटीमध्ये विराट सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.
आम्हाला कुणबीमधून नको तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण द्या अशी मागणी केली आहे, मात्र दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा कडून याला विरोध होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…