व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली. सुशिल सुर्यकांत आठवले या 23 वर्षीय तरुणाचं अपहरण करुन पाच जणांनी त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह म्हैसाळच्या कालव्यात टाकला. हा मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला आहे.
सातव्या दिवशी लंगरपेठ गावाच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सदरचा मृतदेह सापडला. या खुनप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ शहरामधील 23 वर्षीय तरुणाला कवठेमहांकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला खाजगी अॅम्बूलन्समधून काही अंतरावर नेण्यात आलं. त्याची हत्या करून मृतदेह लोखंडी पुलावरून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकला होता.
कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबूली दिली. मृतदेहच सापडला नसल्याने पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करता आला नव्हता. गुरुवारी मेघा सुर्यकांत आठवले यांनी आपला मुलगा सुशिल हा बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दिली. मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर या पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…