ताज्याघडामोडी

अज्ञात दुचाकीवरून आले; रॉडने हल्ला करत जिवंत जाळलं, शिक्षकाचा दुर्दैवी अंत

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जि. प. शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी रॉडने मारून आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मुळचे रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवाशी असून बोरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटना घडल्यानंतर त्यांना सुरवातीला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैयक्तिक वादातून त्यांची हत्या केल्याची चर्चा असून हल्लेखोर फरार झाले आहेत. पेट्रोल टाकून जाळल्यानंतर सोनवणे अर्धा तास रस्त्याच्या कडेला तडफडत होते. भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली असून जऊळका पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी जऊळका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार राठोड हे अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनकडून विविध टीम गठीत करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, या आधीही दिलीप धोंडूजी सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा ते बचावले होते. मात्र यावेळी दैवाने त्यांना साथ दिली नाही. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात भर दिवसा झालेल्या ह्या हल्ल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago