न्यु सातारा समूह ,मुंबई संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए कोर्टी-पंढरपूर मध्ये जागतिक रक्तदान दिनानिमीत्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.शिबीराचे उद्घाटन न्यु सातारा पॉलीटेक्निक कॉलेज ,कोर्टीचे उप-प्राचार्य प्रा.विशाल बाड याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए.चे उप-प्राचार्य प्रा. प्रवीण ताठे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रा.कुलकर्णी यांनी रक्तदान शिबिरामध्ये आलेल्या सर्व रक्तदात्यांचे स्वागत करून जागतिक रक्तदान दिनासंबंधी व शिबीराविषयी माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांनी आजच्या काळात रक्ताची असणारी मागणी व उपलब्धता याचे प्रमाण सांगुण जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले.तसेच रक्तदान केल्याने होणारे शारीरिक फायदे याविषयीदेखील विध्यार्थ्याना व इतर रक्तदात्यांना माहिती सागितली.
यानंतर रक्तदान शिबिरास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.सदर शिबिरामध्ये एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.सदर शिबीरामध्ये न्यु सातारा बी.सी.ए कॉलेज व न्यु सातारा पॉलीटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
सदर शिबिराप्रसंगी न्यु सातारा बी.सी.ए. कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.प्रविण ताठे, प्रा.गोडसे, प्रा.कुलकर्णी, प्रा.सोनुले, प्रा.पाटोळे, प्रा.बडवे, प्रा.उत्पात, प्रा.पाटील, प्रा.लोखंडे, प्रा.पवार इत्यादी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.कुलकर्णी यांनी केले.वरील कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजाराम (नाना)निकम साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…