कल्याण येथील मोहने परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला होता. कल्याण गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत आरोपी उमेश खानविलकर (३०) याला अटक केली आहे. उमेश रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून उमेशने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणच्या मोहने परिसरात बुधवारी सायंकाळी सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. यावेळी सुशील आणि उमेश यांच्यात झालेला जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळून आला. या रागात उमेश याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून सुशील याच्यावर गोळी झाडली. यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली. त्याच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा घटक ३ यांच्या वतीने करण्यात येत होता.
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुप्त बातमीदार मार्फत पोलिसांना आरोपी उमेश हा रेल्वेने बाहेरगावी पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शहाड येथील रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्री १ च्या सुमारास अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हा करताना वापरलेले हत्यार एक गावठी बनावटीचे पिस्टल त्यात एक जिवंत काडतूस तसेच मोबाईल, पॅन कार्ड असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यावर कलम ३०७, कलम ४ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…