ताज्याघडामोडी

रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि….

रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात. अशा वादाच्या घटना कायमच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. ही घटना समोर आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

जावयानं सासऱ्याचं घर जाळल्याची घटना गोंदियामधून समोर आलीय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्राम डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावली वेळेवर आग विझविण्यात आली मात्र या आगीत मोटारसायकल जळाली.

डवकी या गावात राहणारे शंकर राऊत व परिवारातील सदस्य हे रात्री झोपी गेले असतांना रात्री 12 वाजता दरम्यान घराबाहेर अचानक स्पोट झाल्याचा आवाज आल. आवाज येताच शंकर राऊत यांनी घराबाहेर येऊन पाहिलं तर समोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल आणि घराच्या समोरील छतास आग लागली होती. त्यांनी आरडा-ओरडा करताच परिसरातील लोक जमा झाले. नागरिकांनी आग विजवायला मदत केली. आग कोणी लावली याचा शोध घेत असताना त्यांना शंकर राऊत यांचे जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आलं. लोकांना पाहताच त्यांनी तिथून पड काढला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago