जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ अहवाल पाठविण्याची सूचना
पंढरपूर उपनगरातील महत्वाचा प्रश्नांची लवकरच होणार सोडवणूक
पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील काही दिवसांपुर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्यास सूचना केल्यामुळे उपनगरातील लोकांचे आर्थिक नुकसान टळनार आहे.
या उपनगरातील लोकांना अनेक वर्ष शेतसारा कर आणि नगरपालकेतील कर असे दोन्ही कर भरावे लागत होते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे उपनगरातील लोकांनी आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानुसार पाटील यांनी १७जुलै रोजी उपमुख्यमंत्री यांना याबत एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात वरील करापैकी फक्त नगरपालिका कर घेण्यात यावा. या भागातील लोकांना नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे मध्ये समावेश करण्यात यावा. एक घर एक कर घेऊन नागरिकांचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी केली होती.
वरील देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र प्राप्त होताच हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पंढरपूर नगरपालिकेसाठी २१सप्टेंबर रोजी पत्र पाठविले असून याबाबतची प्रत चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आली आहे.
पंढरपूर व उपनगरातील लोकांच्या समस्या असल्याने तत्काळ पावत्या घेऊन संपर्क करावा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वरील पत्रांमधून तात्काळ याबाबतची दखल घेऊन पंढरपूर नगरपालिकेला अहवाल पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून चेअरमन अभिजीत पाटील यांचे विशेष आभार मानले जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…