ताज्याघडामोडी

गवतातून दुर्गंधी यायला लागली; शोध घेताच संशयित गोणी सापडली, उघडताच नागरिकांना बसला धक्का

नाशिक: शहरातील दिंडोरी रोडवर असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील रस्त्याच्या लगत एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांकडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नाशिकच्या दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी चौकशी केली त्यावेळी रस्त्याच्या कडेला एका गोणीत गवतामध्ये हा संशयितरित्या मृतदेह आढळून आला. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत घटनेच्या तपासात सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा, फॉरेन्सिक लॅब, शववाहिका घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना हत्या झाल्याचा अंदाज आहे. मात्र महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने महिलेची हत्या आहे की आणखी काही या मागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे महिलेच्या मृतदेहामागील गूढ समोर आलेले नाही. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र हा मृतदेह कोणत्या महिलेचा आहे याची देखील ओळख पटू शकलेली नाही. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी मृतदेह आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कांदे बटाटे भरण्याच्या जाळीदार गोणी सदर मृतदेह टाकण्यात आला होता तसेच त्या ठिकाणी काही कपडे देखील पोलिसांना मिळून आले आहे. तसेच मृतदेहावर अळ्या पडण्यास देखील सुरुवात झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago