बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलावर आणि बायकोवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत मुलगा गंभीर तर बायको किरकोळ जखमी झाली आहे. धक्कादायक घटनेनंतर बापाने राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना पहाटे घडली आहे. या घटनेनंतर मुलाला आणि बायकोला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग रानबा पवार (वय ५५, रा. सुगाव,ता. अंबाजोगाई) असं आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. नरसिंग पवार यांच्या डोक्यावर मागील काही दिवसांपासून परिणाम झाला होता. त्यांच्या मुलांनी त्यांच्या दवाखान्यासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च केले होते. ते वारकरी संप्रदायातील होते. नेहमीप्रमाणे सर्वजण घरी झोपले असताना नरसिंग पवार यांनी मुलगा व्यंकटेश पवार (वय २८) आणि बायकोवर कुऱ्हाडीने वार केले. यात व्यंकटेश याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर बायको किरकोळ जखमी झाली आहे.
दोन्ही माय लेकरावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कुऱ्हाडीने वार केल्यानंतर घरी कोणी नसल्याने नरसिंग पवार यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केली. नरसिंग पवार यांचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुलावर आणि बायकोवर हल्ला का केला? याची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. मात्र, या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दुःखही व्यक्त आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…