ताज्याघडामोडी

गणपतीसाठी डेकोरेशन केलं, अचानक शॉर्ट सर्किट अन् सारं सपलं, तरुण झोपेतच होरपळला

गणपतीचा उत्साह प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहात सुरू आहे. प्रत्येकाने आपल्याला घरात आपल्याला परीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्ट सर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५) जळून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र, मध्यारात्री घरात शॉर्ट सर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वैनभ गरड हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नी देखील धक्क्यात आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अनेकांना ऐकून हादरा बसला आहे. वैभव याच्या जाण्याने त्याचे मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थामधून हळहळ व्यक्त होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago