गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र पाऊस पडत आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.या पार्श्वभूमीवर आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…