राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना आपत्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटाने विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादीतील अजित पवार गट हा दोन महिन्यापासून सत्तेत सामील झालेला आहे. त्यावर शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना निलंबित करावं अशी मागणी केली होती. पण अजित पवार गटाकडून अद्याप तशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. आता मात्र अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपली राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी असून शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगितलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…