ताज्याघडामोडी

डॉक्टर रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडले होते, पोलिसांनी पाहणी करताच धक्कादायक सत्य समोर

पैशांच्या वादातून रिक्षाचालकाने डोक्यात दगड घालून डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शिळ-डायघर परिसरात घडला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. वसीम सत्तार मेमन असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिळ-डायघरमधील फडके पाडा येथील तलावासमोर रोडलगत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांच्या खिशात असलेल्या मोबाइलवरून नातेवाइकाची माहिती घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव डॉ. सिराज अहमद मंजूर अहमद खान (६२) असून ते, मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली. खान यांना रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

खान यांच्या मृत्यूची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांचा ओळखीचा रिक्षाचालक वसीम सत्तार मेमन (४४) आणि खान यांच्यात पैशांवरून वाद होते, असे उघड झाले. खान यांना आदल्या दिवशी फोनही आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खान यांच्या नातेवाइकांनीही मेमन याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन केले. तांत्रिक विश्लेषण तसेच, घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी मेमन याच्याविरुद्ध पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. त्यामुळे मेमन याला पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर खान यांच्या हत्येचा उलगडा झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago