पुण्यात नेहमी काही ना काही घडत असतं. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की, विचारता सोय नाही. अशीच एक संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. एका ३० वर्षाच्या नराधमाने एका ४ वर्षीय बलिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. अंगणात खेळत असताना पीडित बालिकेला अंधारात आडोशाला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी जोरात ओरडून रडायला लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी आरोपीला पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर कॉलनी, बोराटे चाळ, कोथरुड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पीडितेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. चोरगेने या मुलीला फिरायला नेतो, असे सांगून नेले. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ तिला नेले. अंधारात तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आजोबा तेथे गेले. परिसरातील रहिवासी आणि आजोबांनी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या प्रकरणाचा साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…
रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…