ताज्याघडामोडी

नवीन उद्योग सुरू करताना धाडस महत्वाचे- सुहास अदमाने

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये “इंजिनिअर्स डे” कार्यक्रम उत्साहात संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

सध्या प्रत्येक क्षेत्रात खुप स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे असते. उद्योगात, व्यवसायात प्रेझेंटेशन तसेच वेळेला खुप महत्त्व असते. य मध्ये योग्य नियोजन करून वाटचाल केल्यास यश निश्चित भाटते. याशिवाय व्यवसायात मोठ्या लोकांच्या ओळखी होतात. व्यवसायातील वाईट प्रसंग आहेत. व्यवसायात खुप वाईट अनुभव येतात पण त्यातुन नवीन शिकायला मिळते. हे नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणता प्रोजेक्ट तयार करत असताना मार्केटिंग खुप महत्वाचे असते. ग्राहकांना वेगळे प्रोजेक्ट देणे आवश्यक असते. नवनवीन बदल यामधून अनेक रोग सद्या पसरत आहेत. यासाठी तरुणांकडे जे आहे ते करा, फक्त नोकरी म्हणत बस नका, जे आवडते ते करा असे मत स्पेन्का मिनरल वॉटर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास अदमाने यांनी सिंहगड मध्ये मुलाखतीमध्ये विचारल्या प्रश्नांवर उत्तर देताना मत व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी इंजिनीअर्स डे निमित्त तरूण उद्योजक सुहास अदमाने यांनी उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी मुलाखती घेतली होती.
या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात करिअरच्या संधी कशा असतात अथवा त्या कशा मिळवाव्यात याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या मुलाखतीतून उपस्थित विद्यार्थ्यांना लाभले. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये इंजिनीअर्स डे निमित्त सुहास अदमाने, इंजि. कांतीलाल डुबल, इंजि. शरदचंद्र कुलकर्णी, इंजि. उदय उत्पात आदीसह पंढरपूर मधील अभियंत्याचा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुहास अदमाने यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago