परिश्रमाशिवाय पर्याय नाही- कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय आदाटे
सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचेउत्साहात स्वागत करण्यात आले,या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य सुनील नष्टे, मा.श्री.बाळासाहेब शिंदे,मा.श्री.नदाफ नबीसाहेब व श्रीमती सय्यद.एस.जी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य सुनील नष्टे म्हणाले की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळते चांगल्या लोकांचा सहवास लाभतो तेव्हा तो विद्यार्थी नक्कीच एक आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तत्पर असतो. त्या विद्यार्थ्याकडे पाहून शिक्षक आणि इतर विद्यार्थी देखील प्रभावित होतात.तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी संशोधन दृष्टीकोन ठेवला पाहिजे असा कानमंत्र दिला.
ध्येय आणि स्वप्न ,आत्मविश्वास या गोष्टी विद्यार्थ्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. असे मत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगोला चे प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी केले.
पुढे बोलताना कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय आदाटे म्हणाले की एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण असावा तो म्हणजे ” मेहनत “. मेहनत करून आयुष्यात पुढे जाणारे व्यक्ती जीवनामध्ये किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच यशस्वी होते. म्हणजेच परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.
एल.एस.व्ही.डी.विद्यालय व आण्णासाहेब घुले कनिष्ठ महाविद्यालय, जवळा चे प्राचार्य बाळासाहेब शिंदे म्हणाले कि, स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांचे स्वप्न होते कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारखे अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रशस्त अशा शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली तसेच त्यांनी त्याच्या आठवणीना उजाळा दिला.
संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस संस्थेकडून कायम सहकार्य राहील असे त्यांनी आश्वासन दिले.
संस्थेचे चेअरमन मा.श्री भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे , संचालक डॉ.डी.एस.बाडकर, डिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, पॉलिटेक्निकल प्राचार्य डॉ शरद पवार व प्रा.टी.एन.जगताप, डॉ तानाजी धायगुडे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा राहुल पाटील तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…