भोंदूबाबांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि लुबाडणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सन २०१८पासून हा प्रकार सुरू होता. अखेर याविरोधात तक्रार केल्यानंतर तलासरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
तक्रारदार महिला ही पोलिस असून, तिच्या पतीच्या माध्यमातून भोंदूबाबाशी ओळख झाली. पतीला सरकारी नोकरी लागेल, तसेच घरगुती समस्या दूर होतील, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर तलासरी तालुक्यातील सुत्रकार येथे महिलेच्या माहेरी भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांनी जादूटोणा विधी केला. त्यानंतर पंचामृतात गुंगीचे औषध घालून त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले व भोंदूबाबा रवींद्र भाटे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचे साथीदार दिलीप गायकवाड, गौरव साळवी यांनीही तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पुन्हा पूजाविधी करण्यासाठी कांदीवलीतील मठात नेऊन दिलीप गायकवाड याने अघोरी पूजा विधी केला व पुन्हा लैंगिक अत्याचार केला. या सर्वांनी दोन लाख दहा हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पोलिस महिलेने तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्वांवर कलम ३७६, ३७६(२), ४२०, ३४ या अंतर्गत तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३मधील कलम २, ३, ८प्रमाणे गुन्हा दाखल केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…