कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची पतीने मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर चाकूने भोसकून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे सध्या राज्यात या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक नजद गुलाब सैय्यद यांची मुलगी तथा ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहरप्रमुख राहत सय्यद आपल्या वडिलांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर पती व दोन मुलांसह राहायची. आरोपी पती ताहेमिम नेहमीच राहत हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या ताहेमिम याने पत्नी राहत हीची दोन मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या केली यानंतर त्याने नदीवर जाऊन अंघोळ केली व पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.
मृत राहत हीचे वडील नजद सय्यद हे प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात भरती होते. पहाटे चहा पिण्यासाठी घरी गेले असता घाबरलेल्या नातवांनी घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी वर जाऊन बघितले असता राहत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून पती ताहेमिमविरोधात तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयातून घरी गेलेल्या नजद सय्यद यांनी वरच्या मजल्यावर जाऊन बघितले असता राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ताहेमिम शेख (३८) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने हत्येनंतर पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…