ताज्याघडामोडी

चौथीतील मुलीकडं रोज पैसे येऊ लागल्यानं पित्याला संशय, शाळेतील ‘त्या’ कारनाम्यानं हादरले पालक

वसईतील एका शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीकडं खाऊ खाण्यासाठी रोज पैसे जास्त येत असल्यानं पालकांना शंका आली. मुलीकडं दररोज पैसे कुठून येतात, याची खात्री करण्यासाठी मुलीचे पालक शाळेत गेले. तेव्हा राजाराम मौर्य हा तिला खाऊचे आमिष दाखवून लैगिंक चाळे करीत असल्याचे समजले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी हे वालीव पोलिसांना सांगितलंय.

घटनेमुळं संतप्त नागरिकांनी शाळेत मोठा संतप्त जमाव जमा झाला होता. त्यांनी आरोपीला यथेच्छ चोप दिलाय. मात्र वालीव पोलिसांनी तत्काळ दाखल होवून प्रसंगावधान राखून आरोपीला मारहाण करणाऱ्या लोकांच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेवून अटक केलीय. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

५३ वर्षाचा नराधम राजाराम मौर्य हा ९ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी लगट करून लैंगिक चाळे करीत होता. तो अनेक दिवसांपासून तिला पैसे देत होता. आपल्या मुलीकडे रोज पैसे कुठून येतात, तिला कोण पैसे देतो, का देतो याची चौकशी करण्यासाठी तिचे पालक शाळेत आले होते. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी यथेच्छ चोप दिलाय.

आरोपीला कडक शासन करण्याची मागणी स्थानिक पालकांनी केलीय. या घटनेची माहिती मिळताच वसईच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जमावाला शांत केलंय. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात आणलंय. पीडित मुलीचा आणि पालकांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या मुलगी सुरक्षित आहे. अफवांना बळी पडू नका. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी केलंय.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 week ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago