ताज्याघडामोडी

दुसरं लग्न करून संसारात रमला; तेवढ्यातच पहिल्या बायकोने सतत केली एकच मागणी; वैतागून पती नको ते करून बसला…

जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्यांचा यशस्वी तपास कौतुकास्पद आहे. सुधागड पाली येथे कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी तपास सुरू होता. आता या तपासाला पुर्णविराम मिळाला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. हा अपघात नसून घात असल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील सुधागडमधील नवघर ग्रामपंचायत हद्दीत उंबरवाडी डोंगरावरील जंगलात शनिवारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. यादरम्यान पोलिसांनी परिसरातील मिसिंग केस पडताळण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरड्याची वाडी येथील महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सागर पवार याने जांभूळपाडा पोलीस चौकीत मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन मृत महिलेच्या अंगावरील कपडे कुटुंबाला दाखवले. सागर पवार याच्या कुटुंबियांनी ती सागरची पत्नी कुसबा पवार असल्याचे तात्काळ ओळखले पण पोलिसांना मृत्यूचे कारण समजत नव्हते.

चार दिवसांपूर्वी बेपत्ता तक्रार करणाऱ्या पतीचा उलट तपास केल्यानंतर आणि पोलीसी खाक्या दाखवताच पत्नीचा खून आपणच केल्याचे सांगितले. पाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रोहा विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस, श्वान पथक, RCP टीम, फिंगरप्रिंट टीम, डॉक्टर यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले.

मृत महिलेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मात्र अद्याप महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट होते. पोलिसांनी मृत महिलेचा पती सागर पवार याची झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसी खाक्या दाखवताच सागर पवारने आपणच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. सागरने कुसबाला दिलेले पैसे तिने परस्पर तिची बहीण आणि भावाला दिले होते. ते पैसे ती परत करत नव्हती. शिवाय वारंवार खर्चाकरिता पैसे मागत होती. सागर याने दुसरे लग्न केले होते. त्यामुळे पहिली पत्नी कुसबा आपल्याला मानसिक त्रास देत असल्याच्या रागात तिचा खून केल्याचा कबुलीजबाब आरोपी सागर पवारने दिला आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago